सुस्वागतम

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे येथे आपले मनःपूर्वक स्वागत! 🌿

संपूर्ण गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. आमचे ध्येय म्हणजे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामूहिक सहभाग या मूल्यांवर आधारलेले लोकाभिमुख प्रशासन देणे.

येथे आपण स्थानिक उपक्रम व विकास कामांबद्दल माहिती मिळवू शकता तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व अर्ज प्रक्रियेची मार्गदर्शकता मिळवू शकता. महत्त्वाचे दस्तऐवज, सूचना व ठराव वाचू शकता

आमचा प्रयत्न आहे की सडुरे व शिराळे गावांचा शाश्वत विकास घडवून आणताना, पर्यटकांसाठी पर्यटन सुविधा, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी आणि पर्यावरणाचे संवर्धन यांचा संगम घडवावा.

आपला सहभाग आमच्या गावाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे.

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रुप ग्रामपंचायत – म्हणजेच सडुरे व शिराळे ही दोन गावे एकत्रित येऊन एकच ग्रामपंचायत म्हणून1953 साली स्थापन.

शहिद कौस्तुभ रावराणे सभागृह

देश सेवेसाठी प्रणाची आहुति देणाऱ्या हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मरणार्थ उभारलेले सभागृह

सडूरे शिराळे: आमच्या गावाचा इतिहास

ग्रामपंचायतीचा इतिहास व उपक्रमांचा संदर्भ

           सडूरे शिराळे ग्रामपंचायतीची स्थापना  १९५३ साली झाली. स्थापनेपासूनच ग्रामपंचायत सडुरे – शिराळेने स्थानिक विकासासाठी व सामाजिक सेवांसाठी मोठे कार्य केले आहे.विविध शासकीय योजना व उपक्रमांतून गावकऱ्यांना सामावून घेतले आहे.ग्रामपंचायतीचा भर नेहमी स्थानिक समुदायाशी संवाद साधणे, सहकार्य वाढवणे आणि सामाजिक एकोपा अधिक भक्कम करणे यावर राहिला आहे.

09/08/2022

सडूरे शिराळे ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष रोपण कार्यक्रम राबवताना गावकरी

28/02/2024

सामुदायिक सेवा व विकास कार्यासाठी गावकऱ्यांनी सहभाग वाढवला.

04 /07/2023

सप्तपदी स्वच्छतेची - स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण SSG

आमची ध्येये

गावकऱ्यांना ग्रामपंचायतीतील विविध योजना, कार्यक्रम व घोषणा यांची माहिती सहज उपलब्ध करून देणे.आवश्यक कागदपत्रे, अर्ज व शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचवणे.संवाद, विश्वास आणि सहकार्याच्या माध्यमातून स्थानिक समाज अधिक सक्षम व सबल बनवणे.

आपल्याला काही विचारायचे आहे का?

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमची टीम आपल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक माहिती पुरवण्यासाठी तयार आहे. आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या स्थानिक समुदायात संबंधित राहण्यासाठी आपण आपल्या गरजांबद्दल आमच्याशी संवाद साधा.

Scroll to Top