सडूरे शिराळे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे.

आपल्या गावाची तसेच ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती व सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

आमच्याबद्दल

🏛️ ग्रामपंचायत सडुरे – शिराळे

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे हे स्थानिक प्रशासनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

आमचा उद्देश 

  • गाव व परिसरात शाश्वत विकास साधणे,

  • स्थानिक नागरिकांना आवश्यक सेवा पुरवणे,

  • आणि लोकशाही प्रक्रियेला अधिक मजबूत करणे हा आहे.

     

    १९५३ साली स्थापनेपासून आमच्या ग्रामपंचायतीने अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत.

    • सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

    • स्थानिक विकास योजना

    • शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य आणि पर्यटन विकास क्षेत्रातील कार्य

    आजवर झालेली ही वाटचाल केवळ विकासापुरती मर्यादित नाही, तर पुढील पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे

"ग्रामपंचायतीमुळे स्थानिक समुदायाच्या विकासाला गती मिळते. आम्ही आमच्या लोकांच्या आवश्यकतांची पुरती काळजी घेतो."

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे : विकास प्रकल्प

ग्रामपंचायतीच्या विकास प्रकल्पांची माहिती येथे दिली जाते.
हे प्रकल्प गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवले जात असून, यामधून असलेल्या सुविधांचा दर्जा सुधारला जातो आणि नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते.

प्रमुख विकास उपक्रम
  • 🛣️ पायाभूत सुविधा सुधारणा – रस्ते, पाणीपुरवठा, शौचालये, सार्वजनिक इमारती

  • 🏫 शिक्षण सुविधा – शाळा दुरुस्ती, संगणक शिक्षण, वाचनालय

  • 🌿 पर्यावरण संवर्धन – वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त मोहिमा

  • 🏥 आरोग्य सुविधा – आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा

  • 🏞️ पर्यटन विकास – धबधबे, देवस्थाने व ट्रेकिंग स्थळांचे संवर्धन

  • 💡 नवीन उपक्रम – सौरऊर्जा, पावसाचे पाणी संकलन

घोषणा व समुदाय सेवा

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे आपल्या गावकऱ्यांसाठी व पर्यटकांसाठी वेळोवेळी विविध घोषणा व उपक्रम जाहीर करत असते.
येथे आपणास गावातील ताज्या माहितीबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक उपक्रमांची माहिती मिळू शकते.

प्रमुख समुदाय सेवा
  • 🏥 आरोग्य शिबिरे – ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, लसीकरण मोहिमा

  • 🏫 शालेय उपक्रम – शालेय स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक सहली

  • 🤝 स्थानिक उपक्रम – स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामसभा

✨ आपला सहभाग

प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग हेच या उपक्रमांचे यश आहे.
आपल्या सहभागामुळे गावाचा विकास आणि समाजातील एकोपाही अधिक बळकट होतो.

स्थानिक उपक्रम

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे गावातील सर्व स्थानिक उपक्रम, सामूहिक कार्य, उत्सव व सामुदायिक समारंभांची माहिती येथे उपलब्ध करून देते.

गावाचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

🌿 सामूहिक कार्य
  • स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण

  • ग्रामसभा व जनजागृती कार्यक्रम

  • स्थानिक बाजारपेठ व रोजगार उपक्रम

🎭 उत्सव व समारंभ
  • गावपळन परंपरा

  • वेताई देवी यात्रा (पौष महिना)

  • घोरीप देव यात्रोत्सव

  • सांस्कृतिक कार्यक्रम (लोककला, नृत्य, गीत)

आपले स्वागत आहे!
या सर्व कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांसोबत पर्यटक व पाहुण्यांनाही सामील होण्याचे आमंत्रण आहे.

नवीनतम बातम्या

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे यांच्याकडून नवीनतम बातम्या, सूचना व घोषणांची माहिती येथे नियमितपणे प्रकाशित केली जाईल.

  • गावातील महत्वाचे निर्णय व ठराव

  • नवीन शासकीय योजना व उपक्रमांची माहिती

  • आरोग्य, शिक्षण व विकासाशी निगडित कार्यक्रम

  • आगामी उत्सव व सांस्कृतिक समारंभ

👉 आपल्या ग्रामस्थानाशी निगडित सर्व माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी या पृष्ठाला नियमितपणे भेट द्या.

स्थानिक व्यवसाय

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे स्थानिक व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि ग्रामस्थांना जागरूक करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.
याच उद्देशाने आम्ही गावातील स्थानिक व्यवसायांची माहिती एकत्रित केली आहे.

🌿 व्यवसायांची माहिती
  • स्थानिक शेती उत्पादने (गावठी मध, शिकेकाई, जंगली कडीपत्ता, काळी हळद)

  • हस्तकला व पारंपरिक वस्तू

  • किराणा व दैनंदिन गरजांच्या सेवा

  • लहान-मोठे उद्योग व सेवा केंद्रे

✨ का द्यावे स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन?
  • गावाची अर्थव्यवस्था मजबूत होते

  • स्थानिकांना रोजगार निर्मितीची संधी मिळते

  • निसर्ग व संस्कृतीशी निगडित उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात

  • पर्यटकांना स्थानिक चव व अनुभव घेता येतो

👉 आपल्या स्थानिक व्यवसायाला प्रोत्साहन द्या.
गावाचा विकास आणि ग्रामस्थांची प्रगती या दोन्ही गोष्टींसाठी तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.

आवश्यक कागदपत्रे

ग्रामपंचायत सडुरे – शिराळे यांच्याकडून नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रे आता सुलभपणे उपलब्ध करून दिली जात आहेत.

येथे आपण 

आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करू शकता

  • विविध शासकीय व स्थानिक अर्ज ऑनलाइन भरू शकता

  • प्रक्रियेबद्दल माहिती व मार्गदर्शन मिळवू शकता

✨ उपलब्ध कागदपत्रांचे प्रकार
  • जन्म व मृत्यू दाखला अर्ज

  • रहिवासी दाखला

  • घरपट्टी व कर अर्ज

  • ग्रामपंचायतीचे ठराव / सूचना

सडूरे शिराळे गावची ओळख

सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्ग पर्यटन

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला की डोळ्यासमोर समुद्रकिनारे, किल्ले आणि कोकणी संस्कृती येते. पण या जिल्ह्याच्या पश्चिम घाटात, सह्याद्रीच्या कुशीत अशीही काही गावे आहेत, जी अजूनही पर्यटकांच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यापैकीच दोन ठिकाणे म्हणजे सडुरे आणि शिराळे. ही गावे निसर्गरम्य वातावरण, समृद्ध जैवविविधता आणि शांत ग्रामजीवनामुळे पर्यटकांना अगदी वेगळा अनुभव देतात.

सडुरे गाव –जिथे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण होते.

सडुरे गावात साधारण १८४ कुटुंबे निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य घालवतात. गावाभोवती चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि निसर्ग मुक्तहस्ताने आपली उधळण करतो. या काळात डोंगरांवरून ओघळणारे असंख्य झरे, हिरवाईने नटलेली दरी आणि झाडी, तसेच धुक्याच्या चादरीत लपलेली वाट, हे सर्व अनुभवताना एखाद्या स्वप्नसृष्टीत आल्याचा भास होतो.

निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी सडुरे हे स्वर्गच आहे. गावात येणाऱ्यांना स्थानिकांच्या अभिमानाचे प्रतीक असलेले शहीद मेजर कौस्तुभ रावराणे स्मारकही पाहायला मिळते.

सडुरे गावातील प्रमुख देवस्थाने

सडुरे गाव केवळ निसर्गसंपन्न नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. गावातील मंदिरे, पौराणिक कथा आणि श्रद्धास्थळे स्थानिकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली आहेत.

श्री देव रवळनाथ मंदिर – ग्रामदैवताचे पवित्र स्थान

सडुरे गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री देव रवळनाथ. हे जागृत देवस्थान सुख नदीच्या काठावर वसलेले आहे.

श्री देव रवळनाथ गाव मौजे सडूरे

शिराळे गाव – दुर्मिळ जैवविविधतेचे केंद्र

सडुरे गावापासून अवघे ६ किमी अंतरावर वसलेले शिराळे हे आणखी एक निसर्गरत्न आहे. येथे साधारण ७२ कुटुंबे शांत, निसर्गाशी एकरूप जीवन जगतात.

या भागातील पर्जन्यमान आंबोलीइतकेच असल्याने पावसाळ्यात येथेही धबधब्यांचा गडगडाट, ढगांचे खेळ आणि हिरवाईचे दृष्य अनुभवायला मिळते. या परिसरात अनेक दुर्मिळ वनौषधी, पक्षी आणि वन्य प्राणी आढळतात. त्यामुळे निसर्ग व जैवविविधतेच्या अभ्यासकांसाठी हे ठिकाण संशोधनाची पर्वणी ठरते.

गावाच्या पूर्वेस दाजीपूर राष्ट्रीय अभयारण्य (कोल्हापूर जिल्हा) आणि दक्षिणेस तळीये धरणक्षेत्र (गगनबावडा तालुका) आहे. त्यामुळे संपूर्ण शिराळे गाव जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्यात आहे.

सह्याद्रीच्या जंगलात असंख्य पक्षी आणि वन्यजीव आढळतात. त्यामुळे अनेक पक्षीप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि वन्यजीव संशोधक या गावाला भेट देतात. रंगीबेरंगी पक्ष्यांचे सूर, रात्री ऐकू येणारे जंगलातील आवाज आणि वनस्पतींची विविधता – हे सर्व सडुरेला खास ओळख देतात. इथे फिरताना प्रत्येक पाऊल जणू नवा शोध घेऊन येते.

शिराळेतील गावपळण परंपरा

शिराळे गावातील गावपळनीची परंपरा दरवर्षी पौष महिन्यात पाळली जाते. या विधीसाठी गावकरी श्री देव गांगेक्ष्वराला कौल लावतात, आणि त्यानुसार योग्य दिवस निश्चित केला जातो.

ठरलेल्या दिवशी शिराळेकर आपले संपूर्ण कुटुंब, पाळीव प्राणी आणि घरगुती सामान घेऊन शिराळे गावाची सीमा ओलांडतात.

ते काही दिवसांसाठी (साधारण ५ ते ७ दिवस) शेजारच्या सडुरे गावाच्या हद्दीत स्थायिक होतात.

या काळात ते गावपळणीच्या ठिकाणी आपला संसार थाटतात आणि सामूहिक जीवन जगतात.

गावपळण

ग्राहकांचे अभिप्राय

“सडुरे–शिराळे हा खराखुरा निसर्गाचा खजिना आहे. धबधबे, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे आम्हाला सह्याद्रीची खरी अनुभूती मिळाली. स्थानिक गाईड खूप मदतीचे होते आणि होमस्टेमधील कोकणी जेवण अप्रतिम होतं!”
अनिता पाटील, पुणे
“पक्षीनिरीक्षण आणि ट्रेकिंगसाठी हे गाव एकदम योग्य आहे. सुख नदीचं उगमस्थान आणि गवळणीचा कडा पाहून आम्ही थक्क झालो. पर्यावरणप्रेमींसाठी हे नक्कीच ‘स्वर्गीय’ ठिकाण आहे.”
राहुल देशमुख, मुंबई

सह्याद्री

सडूरे - शिराळे म्हणजे सह्याद्रीचं निसर्ग धाम - येथे धबधबे, दुर्मिळ वनस्पती, पक्षी निरक्षण आणि पारंपरिक देवस्थाने अनुभवताना पर्यटकांना निसर्ग, साहस व श्रद्धेचं मिलन घडतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली सडूरे - शिराळे गावे निसर्ग पर्यटन व जैवविविधते मुळे पर्यट कांना भुरळ घालत आहेत. एकदा अवश्य भेट द्या.
Scroll to Top