पर्यटन विकास आराखडा – सडुरे व शिराळे

सडुरे व शिराळे ग्रामपंचायत समित्यांनी पर्यावरणाचे संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले ध्येय ठेवले आहे.

१) पायाभूत सुविधा सुधारणा

  • रस्ते व ट्रेकिंग मार्ग सुधारणा – धबधबे, मंदिरे व निसर्ग स्थळांकडे जाणारे रस्ते आणि जंगलमार्ग अधिक सुरक्षित व सोयीस्कर करणे.
  • माहितीफलक व दिशादर्शक फलक – पर्यटकांना योग्य मार्गदर्शनासाठी मराठी व इंग्रजी भाषेत फलक उभारणे.
  • पार्किंग व शौचालये – प्रमुख स्थळांवर आवश्यक सुविधा उभारणे.

२) पर्यटकांसाठी सुविधा

  • स्थानिक होमस्टे व न्याहारी केंद्रे – ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकांसाठी स्वच्छ व परवडणारी व्यवस्था वाढवणे.
  • स्थानिक गाईड प्रशिक्षण – जंगल व जैवविविधतेबद्दल सखोल माहिती देण्यासाठी गाईडना प्रशिक्षण.
  • ईको-टुरिझम सेंटर – जैवविविधतेवरील माहिती, फोटोग्राफी व संशोधनासाठी केंद्र उभारणे.

३) स्थानिक उत्पादने व व्यवसाय प्रोत्साहन

  • गावठी मध, शिकेकाई, काळी हळद, सुरुंगीची फुले यांसारखी उत्पादने पर्यटकांपर्यंत पोहोचवणे.
  • हस्तकला व पारंपरिक वस्तूंची विक्री केंद्रे सुरू करणे.
  • स्थानिक बाजारपेठ / हाट – पर्यटकांना खरेदीसाठी एकसंध ठिकाण उपलब्ध करून देणे.

४) पर्यावरण संवर्धन

  • जैवविविधतेचे संवर्धन – दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांना सहभागी करणे.
  • कचरा व्यवस्थापन प्रणाली – पर्यटकांच्या गर्दीतून निर्माण होणारा कचरा वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापित करणे.
  • प्लास्टिकविरहित पर्यटन – गावात व जंगल परिसरात प्लास्टिकवर बंदी लागू करणे.

५) सांस्कृतिक व धार्मिक पर्यटन

  • देवस्थाने विकास – रवळनाथ, वेताई देवी, गांगेक्ष्वर, पावणाई, घोरीप देव या स्थळांचा सुशोभीकरण.
  • यात्रा उत्सव व्यवस्थापन – गावपळणी, देवी यात्रा व घोरीप देव यात्रेचे आयोजन अधिक आकर्षक व सुरक्षित करणे.
  • लोककला सादरीकरण – पर्यटकांसाठी पारंपरिक लोकगीत, नृत्य व कलेचे कार्यक्रम आयोजित करणे.

६) आगामी योजना

  • डिजिटल गाईड अॅप – सडुरे-शिराळे पर्यटनाची सर्व माहिती मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देणे.
  • बर्ड वॉचिंग पॉईंट्स – पक्षी निरीक्षकांसाठी विशेष व्यासपीठ तयार करणे.
  • निसर्गशाळा (Nature School) – विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन.

Scroll to Top